केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी…

केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी…

| Updated on: Jul 14, 2026 | 2:18 PM

ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार असं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे वृत्त आहे. अशात आता ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार असं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे वृत्त आहे. अशात आता ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार असून ते दिल्लीला रवाना होण्याआधीच ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याआधीच नेत्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व नेत्यांना सक्तीने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या विशेष बैठकीत केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असं वृत्त आहे. एकूणच राज्यातील राजकारणात घडमोडींना वेग आलं असून सर्वांच लक्ष यावर लागलं आहे.

Published on: Jul 14, 2026 2:17 PM
Follow Us