Special Report | 3 महिने शेतकऱ्यांची वीज कापणार नाही!

Special Report | 3 महिने शेतकऱ्यांची वीज कापणार नाही!

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 11:26 PM

मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला.

मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) आज विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापतंय, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आजच या प्रश्नी शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा झाली पाहिजे, असा आग्रह धरला. आज मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला. या प्रश्वावरून विधानसभेत एकच गोंधळ सुरु झाला आणि सभागृहाचं कामकाज दुपारी एक वाजता स्थगित करावं लागलं.

Follow Us