मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्… भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप

मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्… भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप

| Updated on: Sep 17, 2026 | 10:34 AM

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात भिवंडीच्या पडघा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शस्त्राचा धाक दाखवून आणि मद्य पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी करत नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांना जबाबदार धरले आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या विरोधात भिवंडीच्या पडघा पोलीस ठाण्यात एका तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्राचा धाक दाखवून आणि मद्य पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

पीडित तरुणीने पोलिसांकडे आणि सरकारकडे स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तिला किंवा तिच्या कुटुंबाला काही झाल्यास त्याची जबाबदारी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांची असेल, असे तिने म्हटले आहे. शैलेश पाटील यांच्यावर यापूर्वीही गँगरेपसह इतर गुन्हे दाखल असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिला एका खोलीत नेण्यात आले, जिथे दरवाजा रिमोटवर लॉक असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. तिला कोंडून ठेवले, दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला, असे आरोप तिने केले आहेत.

या घटनेमुळे भाजपच्या महिला सन्मानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका बाजूला “लाडली बहन योजना” सारख्या योजना राबवत असताना, दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या अशा कृत्यांमुळे पक्षाची दुहेरी भूमिका समोर येत असल्याचे पीडितेने म्हटले आहे.

 

Published on: Sep 17, 2026 10:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us