Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात 39 जणांपैकी ‘या’ 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?

Cabinet Expansion : महायुतीच्या मंत्रिमंडळात 39 जणांपैकी ‘या’ 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?

| Updated on: Dec 16, 2024 | 12:11 PM

भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

नागपूरात अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. काल झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात महायुती सरकारमध्ये ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच ६ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या १९ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ११ आणि अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीतून ९ मंत्र्यांनी शपथ ग्रहण केली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे, पंकज भोईर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची थपथ घेतली. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांची यंदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील आणि इंद्रनिल नाईक अशा नव्या चेहऱ्यांना यंदा संधी देण्यात आली आहे.

Published on: Dec 16, 2024 12:11 PM
Follow Us