आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच…  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली

आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच… खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली

| Updated on: Aug 20, 2026 | 6:12 PM

खाद्यतेलाच्या विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुटं तेल विकता येणार नाही. खाद्यतेल केवळ सीलबंद आणि पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच विकणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास १० लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते.

खाद्यतेलाच्या विक्रीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, आता दुकानदारांना सुटे तेल विकता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. खाद्यतेल कसे तयार केले आहे, याबाबत संपूर्ण माहिती लेबलवर असणे आवश्यक आहे.

नवीन नियमांनुसार, खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद, स्पष्ट आणि पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणे अपेक्षित आहे. सुट्या किंवा वेष्टन रहित खाद्यतेल विक्रीस पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे नियम आधीपासून अस्तित्वात असले तरी, आता त्यांची अंमलबजावणी अधिक कडक केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांनी, ज्यात किराणा दुकाने किंवा सुपरमार्केट समाविष्ट आहेत, त्यांना सील नसलेली किंवा छेडछाड झालेली तेलाची खेप स्वीकारू नये असे सांगण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. असुरक्षित अन्नपदार्थांच्या प्रकरणात कलम ५९ नुसार सात वर्षांपासून ते आजन्म कारावासाची शिक्षा आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अवमानक तेलासाठी ५ लाख रुपयांपर्यंत दंड, तर भेसळयुक्त तेल बाळगल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. लायसन्सशिवाय विक्री केल्यास १० लाखांपर्यंत दंड लागू होईल.

Published on: Aug 20, 2026 6:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us