‘खाऊन खाऊन माजले बोके अन्…’, उद्धव ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी आणले खोके

‘खाऊन खाऊन माजले बोके अन्…’, उद्धव ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी आणले खोके

Harshada Shinkar | Updated on: Mar 26, 2023 | 6:49 PM

VIDEO | मालेगावातील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ५० खोके एकदम ओके अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि इतर समाज घटकांनाही आपल्यासोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाकडून मालेगावात मुस्लिम बहुल भागात उर्दू भाषेत करण्यात आलेली बॅनरबाजी अधिकच चर्चेता विषय ठरली. यानंतर आता या सभेसाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत. अशातच या सभेपूर्वी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर या सभेकरता आलेल्या कार्यकर्त्यांनी खोके आणत त्यावर आक्षेपार्ह मजकूर देखील लिहिलेलया आहेत. त्यामुळे सभेपूर्वी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 26, 2023 6:45 PM
Follow Us