विरोधक-सत्ताधारी दोघेही ‘मुख्यमंत्री पदा’ चा चेहरा जाहीर करेनात, दोघांचे ‘पहेले आप’ सुरुच

| Updated on: Oct 17, 2024 | 12:54 PM

मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यात 'पहेले आप...' अशी अहमिका सुरु झालेली आहे. परंतू दोघांनाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करता येणार नाही अशी त्यांची अडचण झाली आहे. कारण ज्यांच्या जागा जास्त निवडून येणार त्यांच्या मुख्यमंत्री होणार असा अलिखित वायदा झाला आहे.

दोन दिवसांआधी महाविकास आघाडीने ‘गद्दारांचा पंचनामा’नावाचे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. त्यानंतर काल महायुतीने सरकारच्या अडीच वर्षांच्या कारभारचे ‘रिपोर्ट कार्ड’ काढले आहे. यावेळी महायुतीने बुधवारी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर प्रचंड टीका केली. आम्ही काम केले आहे. म्हणून रिपोर्ट कार्ड काढत आहोत, त्यासाठी हिंमत लागते. आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणाला डोहाळे लागलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता हाणला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या विचित्र राजकीय परिस्थिती महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करु शकत नाहीत अशी स्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आधी महायुतीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा मग आम्ही आमचा काय तो निर्णय घेऊ असे म्हटले होते. काल महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे कोणाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, आमचे सवा दोन वर्षाचे काम हाच आमचा चेहरा आहे असेही शिंदे म्हणाले. आधी महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा उघड करावा असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर एकनाथ शिंदे यांनी त्यांनी आधी विरोधी पक्ष नेते पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली. परंतू दोघेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा उघड करु शकत नाहीत अशी त्यांची अडचण झाली आहे.

Published on: Oct 17, 2024 12:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us