मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्याबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्याबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Harshada Shinkar | Updated on: Jun 17, 2023 | 4:14 PM

VIDEO | मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण काय?

ठाणे : एका रिक्षाचालकाने चक्क मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरच रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ठाण्यात धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरटीओने त्याचा रिक्षा परवाना रद्द केल्याने हताश होऊन रिक्षाचालकाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील दुर्घटना टळली. ठाणे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे सदर रिक्षाचालक हा कोपरी पाचपाखाडी परिसरात शिवसेना पदाधिकारी आहे. विनय पांडे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. विनय पांडे या रिक्षाचालकावर अनेक गुन्हे दाखल असल्याने आरटीओने त्याचा रिक्षा परवाना रद्द केल्याची प्राथमिक माहिती मिळते. आरटीओने रिक्षा परवाना रद्द केल्याने पांडे हताश झाला. यानंतर त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला गाठला अन् आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Published on: Jun 17, 2023 3:57 PM
Follow Us