गडचिरोलीमध्ये भरधाव ट्रकची शाळेच्या बसला धडक, 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

| Updated on: Mar 31, 2022 | 5:57 PM

राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना ट्रक आणि बसमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

Follow us on

नवेगाव मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना ट्रक आणि बसमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले. गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यानंतर व्हॅन पलटली. त्या व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झालेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.