Ganesh Chaturthi 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक

Ganesh Chaturthi 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक

Harshada Shinkar | Updated on: Sep 27, 2023 | 2:24 PM

VIDEO | तब्बल 21 फुटी अशा सुंदर आणि आकर्षक रथातून श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची मिरवणूक काढली जाणार आहे. संपूर्ण विद्युत रोषणाईने हा रथ सजवण्यात येणार असून या गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मानाचे गणपती निघाल्यानंतर दगडूशेठ मंडळाला विसर्जन मिरवणुकीत प्रवेश

पुणे, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबईनंतर पुणे शहरात देखील गणेशोत्सवाचा उत्साह मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सवाचा नववा दिवस असल्याने उद्या जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वंत्र गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाची गणाधिश रथातून श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन रथाची पहिली झलक समोर आली आहे. तब्बल 21 फुटी अशा सुंदर आणि आकर्षक रथातून बाप्पाची मिरवणूक काढली जाणार आहे. संपूर्ण विद्युत रोषणाईने हा रथ सजवण्यात येणार असून या गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील सर्व मानाचे गणपती संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास बेलबाग चौकातून रवाना होतील, त्यानंतर दगडूशेठ मंडळाला विसर्जन मिरवणुकीत प्रवेश देण्यात येणार आहे.

Published on: Sep 27, 2023 2:24 PM
Follow Us