Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
वनमंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेवरून मोठे विधान करत आपली नाराजी स्पष्ट केली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून 30 वर्ष न झालेल्या, पडझडीला न आलेल्या आणि अतिधोकादायक नसलेल्या इमारतींमध्ये क्लस्टर डेव्हलोपमेंटचा फॅड उभा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
यावेळी गणेश नाईक यांनी पुढे बोलताना म्हटले की, गणेश नाईकच्या नादासा लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देार नाही. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी हा इशारा थेट एकनाथ शिंदे यांच्यासाठी असल्याची चर्चा आहे.
आता शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी वाढतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.