Marathi News Videos Gopichan Padalkar and Sharad Pawar NCP Argument Went Viral Padalkar Car Attacked By Unknow Person

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 1 July 2021
आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून पडळकरांविरोधी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान सोलापूरात एका अनोळखी इसमाने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केल्यामुळे हा वाद आणखीच वाढला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. पडळकरांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रावादी पक्षातून पडळकरांवर बऱ्याच टीका करण्यात येत होत्या. त्याच दरम्यान सोलापुरात पडळकरांच्या गाडीवर महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत भला मोठा दगड टाकून एक व्यक्ती पळाला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही पक्षातील वाद आणखी वाढला असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत तर नेते देखील एकमेंकावर टीका करत आहेत.
Related Video
रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा हिरमोड
रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा
टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
राज्यातील या बँकेला आरबीआयची नोटीस, मोठी खळबळ, तुमचंही खातं आहे का?
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें