Gunaratna Sadavarte : बम्बई में आना नहीं है भाई…बम्बई में कानून… सदावर्ते म्हणाले जरांगे पाटलांना मुंबईत No Entry

Gunaratna Sadavarte : बम्बई में आना नहीं है भाई…बम्बई में कानून… सदावर्ते म्हणाले जरांगे पाटलांना मुंबईत No Entry

| Updated on: Aug 26, 2025 | 4:26 PM

मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन दिसत असलं तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी हल्लाबोल केलाय

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र त्यापूर्वी मुंबई हायकोर्टाने त्यांना मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी आझाद मैदानाची परवानगी हाय कोर्टाकडून नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची पुढची दिशा काय असणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकरताच सदावर्त म्हणाले, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आम्ही रितसर पोलिसांकडे तक्रार देत न्यायालयातही अर्ज केला होता. मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. तर यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचे म्हणत थेट हल्लाबोल चढवला आहे. मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी प्रवेश नाही. ही मुंबई आहे इथे कायदा चालतो, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.

Published on: Aug 26, 2025 04:13 PM