Gunratna Sadavarte on Manoj Jarange : मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस; सदावर्तेंचा आरोप, उपोषणापूर्वीच अटकेची मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वीच ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. सदावर्तेंनी जरांगे यांना एकनाथ शिंदेंचा राजकीय प्यादा असे संबोधले असून, त्यांची भाषा अतिरेकी आणि देशद्रोही असल्याची टीका केली आहे. […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वीच ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
सदावर्तेंनी जरांगे यांना एकनाथ शिंदेंचा राजकीय प्यादा असे संबोधले असून, त्यांची भाषा अतिरेकी आणि देशद्रोही असल्याची टीका केली आहे. सदावर्तेंच्या मते, जरांगे हे कोणाचे तरी प्यादे आहेत आणि त्यांना अटक करणे आवश्यक आहे, नुसता एफआयआर दाखल करणे पुरेसे नाही.
दुसरीकडे, जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मुंबईच्या दिशेने आणण्याचा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी सणासुदीच्या काळात आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते, ज्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत न येण्याचा निर्णय घेतला असल्याचे लाड यांनी सांगितले. मराठा संघटनांनी २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी १७ ऑगस्ट रोजीच मुंबई पोलिसांना पत्र दिले होते. जुन्याच मागण्यांसाठी जरांगे पुन्हा उपोषणाला बसले असून, सरकार केवळ तोंदेखलेपणा करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
