Harshwardhan Sapkal | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची ठाम भूमिका; भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?…. सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

Harshwardhan Sapkal | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची ठाम भूमिका; भाजपला बिनविरोध शब्दाचा एवढा पुळका?…. सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Apr 09, 2026 | 11:46 AM

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची अट ठेवली आहे. “ही अट चुकीची नाही, उलट तिची गरजच नव्हती,” असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत निवडणुकीपूर्वी संवाद साधला नसल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत अपघाताच्या चौकशीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची अट ठेवली आहे. “ही अट चुकीची नाही, उलट तिची गरजच नव्हती,” असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत निवडणुकीपूर्वी संवाद साधला नसल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत अपघाताच्या चौकशीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला म्हणून काँग्रेसकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. तिथे एकूण 53 अर्ज दाखल झाले आहे पण त्यावर कोणी बोलत नाही. भाजपला बिनविरोध शब्दाचा पुळका आला आहे. तुम्ही एक पॅटर्न सुरू केला आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत असं सपकाळ म्हणाले. त्यांनी पालिका, नगरपंचायतमध्ये लोकांना पैसे देऊन अर्ज मागे घ्यायला लावले, धमक्या दिल्या, कॉलर पकडून अर्ज मागे घ्यायला लावले असं देखाल सपकाळ म्हणाले. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. निकोप वातावरणात निवडणूक झाल्या पाहिजे हे सर्वांचं म्हणणं होतं. पण भाजपने तसं केलं नाही अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीकास्त्र सोडलं.

Published on: Apr 09, 2026 11:46 AM
Follow Us