मुंबईत ठाकरे गटाचा मेळावा, आदित्य ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन; यासह जाणून घ्या इतर घडामोडी

| Updated on: Feb 01, 2023 | 9:07 AM

मुंबईतील देवनारमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा होणार

Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही, त्यांना अनिल परब यांच्यासारखे कारकून लागतात, असे वक्तव्य करताना नितेश राणे यांची जीभ घसरली. मुंबईतील देवनारमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. सुक्या धमक्या देऊ नका, आमच्या घरात धिंगाणा घालणं इतकं सोपं नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. ऑफिस तोडण्यावरून अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष पेटला आहे. अनिल परब यांचा म्हाडाच्या ऑफिसमध्ये चार तास ठिय्या आंदोलन, तर म्हाडा ऑफिस बाहेर शिवसैनिकांचा मोठा राडा देखील पाहायला मिळाला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असून यामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…