AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MEA: ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग, भारतानं इशारा देत नेमकं काय सांगितलं?

MEA: ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग, भारतानं इशारा देत नेमकं काय सांगितलं?

| Updated on: May 13, 2025 | 7:44 PM

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत, सिंधू जल करार आणि काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही असे म्हणत POK वरही भूमिका जाहीर केली.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकिस्तानाला पाक व्याप्त काश्मीर म्हणजे पीओके खाली करावा असा कडक दम भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्याचे पाहायला मिळाले. तर काश्मीरच्या मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही, असेही भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर हरल्यानंतर पाकिस्तानला जल्लोष करण्याची सवयच आहे अशा शब्दात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले आहे.

नेमकं काय म्हटलं?

पाकिस्तानला पीओके खाली करावा.

जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार.

काश्मीरच्या मुद्द्यावर कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही.

भारत आणि अमेरिकेमधील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता.

भारत पाकमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार.

टीआरएफला दहशतवादी संघटनांची यादीत टाकावे.

दरम्यान, दहशतवाद्यांचे पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांचे पुरावे असल्याचे म्हणत टीआरएफने पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, अशी माहिती दिली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत मध्यस्थी केल्याचा दावा होत होता. ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

Published on: May 13, 2025 07:44 PM