MEA: ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? मोदी सरकारनं थेट सांगितलं
भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, युद्धबंदीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्हाला काश्मीरवर मध्यस्थी मान्य नाही. पाकिस्तानला पीओके खाली करावा लागेल
गेल्या आठवड्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद आणि इतर ठिकाणी असलेल्या दहशतवादी अड्डे भारताने उद्ध्वस्त केले आहे. यासह १० मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बरेच एअरबेस उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानचा सूर काहिसा बदलल्याचे पाहायला मिळत. यानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवण्याचा आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानला गोळीबार थांबवण्यास भाग पाडले. इतर देशांप्रमाणेच, भारताने स्पष्ट संदेश दिला आणि जनतेला सांगितले की भारताने २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यांना दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर, जेव्हाही पाकिस्तानी सशस्त्र दलांनी गोळीबार केला तेव्हा भारतीय सैन्याने त्याला योग्य उत्तर दिल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत, सिंधू जल करार आणि काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही असे म्हणत POK वरही भूमिका जाहीर केली. दरम्यान, आता ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? हे भारत सरकारनं नेमकं सांगितलं आहे.