Operation Sindoor : भारतानं एका झटक्यात LOC वरील पाकिस्तानच्या चौक्या उडवल्या, व्हिडीओ पाहताच तुम्ही म्हणाल….
गेल्या अनेक दिवसापासून भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या चौक्या उडवल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. याअंतर्गत, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी, भारतीय सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी चौक्या एकाच झटक्यात उडवून दिल्याची माहिती असून याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळाले. आधीच तयार असलेल्या भारतीय सैन्याने सीमेपलीकडून येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे आकाशात हानून पाडली. तर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केल्याचे दिसून आले. यामुळे सीमेलगतच्या गावांचं मोठं नुकसान झालं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

