Operation Sindoor : पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?

Operation Sindoor : पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?

| Updated on: May 08, 2025 | 5:02 PM

India Air Strike On Pakistan : पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं एस - 400 सिस्टिम नेमकं काय आहे? या सिस्टिमने पाकिस्तानला पूर्ण धुळीत मिळवलं आहे.

गुजरातच्या कच्छमध्ये पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होता. हा डाव आज भारतीय लष्कराने हाणून पडला आहे. 50 ड्रोन हल्ले करून आज ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यासाठी भारताने पहिल्यांदाच एस-400 चा वापर केलेला आहे. या एस-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे भारतातील 15 शहरावरचे हल्ले परतवून लावले आहेत. एस-400 एकाच वेळी 36 लक्ष्यांवर टार्गेट करू शकते. एस-400मध्ये एकाच वेळी 4 वेगळ्या प्रकारच्या मिसाईलचा वापर होतो. लढावू विमान, क्रूझ मिसाईल क्षणात पाडते. अमेरिकन पॅट्रीयट सिस्टिमपेक्षा देखील एस-400 जलद आहे. एस-400 ही सिस्टिम भारताने रशियाकडून घेतलेली असून आज पहिल्यांदाच या सिस्टिमचा वापर करण्यात आलेला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. एकूण 15 शहरांना पाकिस्तानने टार्गेट केलेलं होतं. पाकिस्तानचा हा डाव भारताने उलथून लावला आहे.

Published on: May 08, 2025 05:02 PM