AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Army Press Conference : पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता - लेफ्टनंट जनरल राजीव घई

Indian Army Press Conference : पाकिस्तानचा पापाचा घडा भरला होता – लेफ्टनंट जनरल राजीव घई

| Updated on: May 12, 2025 | 3:20 PM
Share

पाकिस्तानचा पापाचा घडा भरलेला असल्याचं लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे.

पाकिस्तानचा वारही बॉर्डरच्या त्या पलिकडून होईल हे माहीत होतं. त्यामुळे आम्ही एअर डिफेन्सची तयारी आधीच केली होती. काऊंटर मॅन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर साधन आणि सर्व प्रकारच्या सिस्टिमचं मिश्रण केलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाकिस्तान एअरफोर्सने ९ आणि १० मे रोजी सातत्याने हल्ले केले. पण ते या मजबूत एअर डिफेन्स समोर अपयशी ठरले. आंतरराष्ट्रीय बॉन्ड्रीवरून रडार आणि अनेक गोष्टी येत होत्या, असं लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी आज भारतीय लष्कराकडून तिन्ही सैन्यदलाची संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी घई बोलत होते.

पुढे राजीव घई यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूरला एका कॉन्टेक्स्टमध्ये समजलं पाहिजे. गेल्या काही वर्षात दहशतवाद्यांच्या कॅरेक्टरमध्ये बदल झाला आहे. मिलिटरीसोबत नागरिकांवर हल्ले होत होते. २०२४मध्ये शिवखोरी मंदिरात जाणारे प्रवासी, पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ला हा खतरनाक ट्रेंडचं द्योतक आहे. पहलगाम हल्ला हा पापाचा घडा भरल्याचं दिसून येतं. पाकिस्तानी मल्टिटिअर डिफेन्सला पार करून आम्हाला टार्गेट करेल अशी संधीच नव्हती. अॅशेस टू अॅशेस, डस्ट टू डस्ट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. यावरून तुम्ही समजू शकता आपण काय केलं.
बॉर्डर सेक्युरिटीवरील आमच्या सर्वच जवानांनी आपल्याला साथ दिली. त्यामुळे पाकचा नापाक इरादा कमी केला. कोणत्याही संदिग्ध दुश्मनांच्या विमानांना जवळ येण्याची आम्ही संधीच दिली नाही. आपले सर्व मिलिटरी बेसेस आणि ऑपरेशनच्या गोष्टी ऑपरेशनल आहेत आणि गरज पडल्यास तयारही आहेत, असा इशाराच राजीव घई यांनी या पत्रकार परिषदेतून दिला आहे.

Published on: May 12, 2025 03:20 PM