Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने… अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता विमानसेवेलाही बसू लागला आहे. खराब हवामानामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एक थरारक घटना घडली. इंडिगोचे एटीआर विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना अचानक कमी दृश्यमानतेची समस्या निर्माण झाली
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता विमानसेवेलाही बसू लागला आहे. खराब हवामानामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एक थरारक घटना घडली. इंडिगोचे एटीआर विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना अचानक कमी दृश्यमानतेची समस्या निर्माण झाली. त्यामुळे वैमानिकाला धावपट्टी स्पष्टपणे दिसेनाशी झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वैमानिकाने मोठे प्रसंगावधान दाखवले. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले असतानाच त्याने तात्काळ गो-अराउंडचा निर्णय घेत विमान पुन्हा आकाशात झेपावले. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खराब हवामानातही वैमानिकाने दाखवलेल्या सतर्कतेचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी “क्षणभर काळजाचा ठोका चुकला” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सध्या मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
