Jaisalmer News : युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
India - Pakistan Conflict : भारताच्या सीमावर्ती भागांवर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेलं होतं.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आता जनजीवन पुन्हा पूर्वपदावर यायला लागलं आहे. जैसलमेरच्या हनुमान चौकातली दुकानं आता सुरू झालेली असली तरी या बाजारपेठेकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे. भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर सीमावर्ती भागांवर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. यात राजस्थान, अमृतसर, जम्मू काशीर मधल्या काही गावांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर येथील नागरिक भीतीच्या छायेत होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार आणि मिसाईल सोडणे सुरू होतं. त्यामुळे जैसलमेरमध्ये रेड अलर्ट जारी होता. आता मात्र दोन्ही देशांनी शस्त्रबंदीचं उल्लंघन न करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता असली तरी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे.