Jitendra Awhad : लोकसंख्या वाढली, पण रेल्वेने सोय केली नाही; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad on train accident : मुब्रा स्थानकात झालेल्या अपघातावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्य रेल्वेचे प्रशासनच मुब्रा स्थानकात झालेल्या अपघाताला जबाबदार आहे. तसेच रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई लोकलमधून पण सुविधांचे काय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दिवा, मुंब्रा आणि कळवा या शहरांमधील लोकसंख्या ही हजारपटीने वाढली आहे. याठिकाणी लोवास्ती प्रचंड वाढली असून हे सर्व मध्यमवर्गीय कामावर जाणारी लोकं आहेत. यामधील बहुतांश लोक हे मुंबई लोकलचा उपयोग करतात. अशामध्ये आम्ही अनेकदा दिवा – सीएसएमटी अशी लोकलसेवा सुरु करा, अशी मागणी केली आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतरही लोकलच्या फेऱ्या वाढल्या नाहीत. दिवा – सीएसएमटी लोकलसेवा सुरु केल्यानंतर गर्दी कमी होईल, असंही यावेळी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

