विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र… कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?

विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र… कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?

| Updated on: Aug 06, 2026 | 4:17 PM

शिवसेना नेमकी कुणाची, याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होत आहे. दोन्ही गटांकडून आपापली बाजू मांडली जात असून, आजच्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षातील अधिकार याबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. विधीमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं. याचा अर्थ शिंदेंना पक्षाची घटना बदलण्याचे अधिकार मिळत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

तसेच, 2018च्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्षावर अवलंबून असतो. तसेच, विधीमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षात पडलेली फूट मानायची का? असा सवाल कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केला.

Published on: Aug 06, 2026 4:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us