ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं…कपिल सिब्बल यांचा कोर्टात ‘सुप्रीम’ युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?

ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं…कपिल सिब्बल यांचा कोर्टात ‘सुप्रीम’ युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?

| Updated on: Aug 18, 2026 | 4:53 PM

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटी प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरकावर भर दिला. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, मूळ शिवसेना राजकीय पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, तर फूट केवळ विधिमंडळ पक्षात झाली आहे. सादिक अली प्रकरणात राजकीय पक्षातील फुटीचा उल्लेख होता, मात्र सध्याचे प्रकरण वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीसंदर्भात सुनावणी सुरु असाताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या मते, ही फूट केवळ विधिमंडळ पक्षात आहे, मूळ राजकीय पक्षात नाही. 2018 च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना सर्व पदे दिली होती. सादिक अली प्रकरणापेक्षा सध्याची परिस्थिती वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटी प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरकावर भर दिला. सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, मूळ शिवसेना राजकीय पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, तर फूट केवळ विधिमंडळ पक्षात झाली आहे. सादिक अली प्रकरणात राजकीय पक्षातील फुटीचा उल्लेख होता, मात्र सध्याचे प्रकरण वेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिब्बल यांनी नमूद केले की, 2018 च्या शिवसेनेच्या घटनेनुसारच 39 सदस्य निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांना मिळालेली सर्व मंत्रीपदे आणि नेतेपदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिली होती. त्यामुळे, ज्या घटनेनुसार त्यांना पदे मिळाली, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असे सिब्बल म्हणाले. 19 जुलै रोजी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली तेव्हा त्यांच्याकडे केवळ आमदारांच्या पाठिंब्याची कागदपत्रे होती, मूळ पक्षात फूट पडल्याचा पुरावा नव्हता. त्यामुळे आयोगाला सुनावणी घेण्याचा अधिकारच नव्हता, असा दावा सिब्बल यांनी केला.

Published on: Aug 18, 2026 4:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us