KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! “काका मला मारू नका, मी… ” डॉक्टर लेकीची अवस्था सांगताना वडील भावूक

KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! “काका मला मारू नका, मी… ” डॉक्टर लेकीची अवस्था सांगताना वडील भावूक

| Updated on: Jul 11, 2026 | 5:00 PM

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य तीन जणांना कल्याण सत्र न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेत जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडिलांनी मुलीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी सांगितले की, सृष्टी अजूनही मानसिक धक्क्यात असून झोपेतही घाबरून उठते आणि किंचाळते.

वाडिया रुग्णालयातील सेवा सोडून सृष्टीने गरजू रुग्णांसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिच्यावरच हल्ला झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

डॉक्टरांविरोधात तक्रार असल्यास कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी म्हटले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Jul 11, 2026 5:00 PM
Follow Us