Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top 10 @5:30PM : अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही, नागपाडा भागात मोठी दुर्घटना.. वाचा टॉप 10 बातम्या

| Updated on: Mar 09, 2025 | 6:11 PM

Top 10 News Updates : धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत धसांना इशारा, महाकुंभवरील पवित्र स्नानावरून राज ठाकरे यांनी उडवली खिल्ली, गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालला एका दिवसाची पोलीस कोठडी, यासह वाचा इतरही महत्वाच्या घडामोडी.

  • माझ्या आईवर खोटे आरोप कराल, तर गप्प बसणार नाही. धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत धसांना इशारा.
  • महाकुंभवरील पवित्र स्नानावरून राज ठाकरे यांनी उडवली खिल्ली. नांदगावकरांनी आणलेलं गंगेतलं पाणी पिण्यास दिला नकार. राज ठाकरेंचा खुलासा.
  • घरी बसून कुंभ मेळयाचं पाणी अस्वच्छ म्हणण चुकीचं, आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. भाजपचे आमदार राम कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
  • गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालला एका दिवसाची पोलीस कोठडी. पुण्यात भररस्त्यात केलं होतं अश्लील कृत्य.
  • संतोष देशमुख हत्येप्रकरणी बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चा. मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी.
  • तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललं आहे, त्यांना पाठीशी घालू नका – वैभवी देशमुख.
  • .. नाही तर तुझा बाबा सिद्दीकी करू, महेश गायकवाड यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी.
  • मुंबईतील नागपाडा भागात पाण्याची टाकी साफ करताना 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू. एकाची प्रकृती गंभीर.
  • अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्याने हप्ता 2100 करणं सध्या अशक्य.
  • कर्नाटकातील अलमट्टी धरणाची ऊंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला बजावलं.
Published on: Mar 09, 2025 06:11 PM