गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की… अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?

गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की… अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?

| Updated on: Jul 25, 2026 | 2:14 PM

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू असताना कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही लक्ष्य केले. त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अभिजीत दीपके म्हणाले की, “मोदींनी गेल्या 12 वर्षांत देशात भीतीचे वातावरण निर्माण केले. पण आता परिस्थिती बदलली असून भीतीच संपली आहे.” त्यांनी जेंनझी तरुणांचा उल्लेख करत, “हे तरुण त्यांच्या आई-वडिलांचेही ऐकत नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही व्यवस्थेला घाबरणार नाहीत,” असे मत व्यक्त केले. नीट प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला.

बिहारमध्ये आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली.“जितके विद्यार्थी अटक कराल, त्यापेक्षा अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील,” असा इशारा त्यांनी दिला.

नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.दरम्यान, या आंदोलनामुळे नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका सुरू आहे.

Published on: Jul 25, 2026 2:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us