Nagpur | नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमध्ये अडचणी

Nagpur | नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमध्ये अडचणी

| Updated on: Mar 13, 2026 | 5:07 PM

नागपुरात आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सी उघडण्याच्या आधीपासूनच अनेक नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे चित्र राज्यातील इतर भागांमध्येही काही प्रमाणात पाहायला मिळत आहे.

नागपुरात आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सी उघडण्याच्या आधीपासूनच अनेक नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे चित्र राज्यातील इतर भागांमध्येही काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी नागरिकांच्या रांगा कायम असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, सिलेंडरची उपलब्धता असली तरी ऑनलाईन बुकिंग करताना अनेक अडचणी येत आहेत. ओटीपी न मिळाल्यास घरपोच गॅस सिलेंडर मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण थेट गॅस एजन्सीवर जाऊन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीमुळे नागपुरात गॅस एजन्सीसमोर नागरिकांची गर्दी आणि लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

Published on: Mar 13, 2026 05:07 PM
Follow Us