Chhagan Bhujbal | LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय, भुजबळांनी दिली मोठी माहिती

Chhagan Bhujbal | LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय, भुजबळांनी दिली मोठी माहिती

| Updated on: Mar 17, 2026 | 5:38 PM

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये नागरिकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास केरोसीन वितरणाचाही पर्याय विचारात घेतला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भुजबळ यांनी माहिती दिली की, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Mar 17, 2026 5:38 PM
Follow Us