VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 October 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 1:55 PM

शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार अमोल कोल्हे सभा गाजविणारे वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या मनातील भावना ते व्यक्त करत असतात. अनेकवेळा राजकीय फटकेबाजीच्या माध्यमातून ते विरोधकांवर तसंच स्वपक्षीयांनाही डोस पाजत असतात. भोसरीमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.