MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 7:46 AM

संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचं आणि जामीनाचं मोठं राज्यकीय नाट्य मंगळवारी घडलं. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावरुन राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ‘संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

Published on: Aug 26, 2021 07:46 AM