Thane | ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, दुकानं उघडताच आत शिरण्याचा प्रयत्न

| Updated on: Oct 11, 2021 | 7:31 PM

महाविकास आघाडी सरकारनं राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. व्यापारी वर्गानेही दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. मात्र, दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. ठाण्यात दुपारी उघडलेल्या दुकानात शिरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यक्रत्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे पुढील प्रकार टळला. 

Follow us on

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. व्यापारी वर्गानेही दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. मात्र, दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. ठाण्यात दुपारी उघडलेल्या दुकानात शिरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यक्रत्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे पुढील प्रकार टळला.

दुसरीकडे ठाण्यात आज सकाळपासूनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात उपमहापौर यांचे पती पवन कदम आणि काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्यावेळी रिक्षा वाहतूक सुरु असल्याचं पाहून त्यांनी रिक्षाचालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने तर हातात काठी घेत येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकांना मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. पवन कदम यांनीही एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती लागलाय.