Special Report | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? कुणाची लागणार वर्णी?

Special Report | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? कुणाची लागणार वर्णी?

Harshada Shinkar | Updated on: May 20, 2023 | 7:44 AM

VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कुणाची मंत्रिपदासाठी कुणाला संधी मिळू शकते? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणताय त्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत आले होते. यावेळी नड्डांची शिंदे फडणवीस यांच्यासोबत वर्षावर बैठकही झाली आणि या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. काही नावांवर चर्चा झाली असून विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानं सरकार टिकलंय त्यामुळे विस्तारासंदर्भात कोणतीही अडचण नाही. मात्र विस्तारापूर्वी फडणवीस यांनी आमदारांचे कानही टोचलेत. पक्षाकडे मंत्रिपद मागण्यापेक्षा मी पक्षाला काय देणार हे सांगण्याची वेळ आहे, असे फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळविस्तारात शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये अधिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत कुणा-कुणाचा समावेश आहे बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 20, 2023 7:44 AM
Follow Us