Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

| Updated on: Sep 16, 2026 | 9:02 AM

मनोज जरांगे यांच्या भाषेचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. जरांगेंची भाषा अयोग्य असून आंदोलकांची भूमिका आक्षेपार्ह असल्याची मंत्र्यांची भूमिका होती. मराठा समाजासाठी सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना उत्सवादरम्यान मुंबईत आंदोलनावर मंत्र्यांनी सवाल उपस्थित केला. फडणवीसांकडे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

मनोज जरांगे-पाटील यांनी वापरलेल्या भाषेचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत. जरांगेंकडून वापरली जाणारी भाषा अयोग्यच असल्याची भूमिका सर्व मंत्र्यांनी घेतली आहे. सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

मंत्र्यांनी असे मत मांडले की, सरकार मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना, आंदोलनकर्त्यांकडून जी भूमिका घेतली जात आहे ती आक्षेपार्ह आहे. विशेषतः, गणेशात्सवासारख्या हिंदू उत्सवांच्या काळातच मुंबईत आंदोलन का केले जात आहे, असा सवालही मंत्रिमंडळातील सदस्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जरांगे-पाटील यांच्यासह लक्ष्मण हाके आणि विद्यानंद बापट यांसारख्या नेत्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published on: Sep 16, 2026 9:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us