Ajit Pawar Death in Plane Crash LIVE Updates : अजित पवारांचा राज्यासह देशाला हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर

Ajit Pawar Death in Plane Crash LIVE Updates : अजित पवारांचा राज्यासह देशाला हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर

| Updated on: Jan 28, 2026 | 10:20 AM

Maharashtra Deputy CM Ajit Pawar's plane crash Death in Baramati LIVE Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ लँडिंगदरम्यान मोठा अपघात झाला आहे. या घटनेत अजित पवारांसह इतरही काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. विमान पूर्णतः जळून खाक झाले असून, घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. अग्निशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर पोलीस गर्दी नियंत्रणात आणत आहेत.

बारामतीजवळ आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह इतरही काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबईहून बारामतीला येत असताना हे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात असले तरी, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघातानंतर विमानाने तात्काळ पेट घेतला आणि ते पूर्णतः जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सकाळी ९:३० वाजता अजित पवार यांची तीन सभांसाठी बारामती येथे उपस्थिती अपेक्षित होती. अपघाताची माहिती मिळताच बारामती आणि आसपासच्या भागातून कार्यकर्ते व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Published on: Jan 28, 2026 10:20 AM