मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!

मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!

| Updated on: Jun 08, 2026 | 5:55 PM

अमरावतीतील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ आणि दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अमरावतीतील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ आणि दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, वरिष्ठ अधिकारी तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध विविध कामांसाठी दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला मोठ्या तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पीडित महिलेने पोलिसांकडे काही ठोस पुरावे सादर केले आहेत. यात ऑडिओ क्लिप्स, पेन ड्राइव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रे यांचा समावेश आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून पुढील चौकशी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाहीत महिलने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे व्यथा मांडली असून त्यांनी लगेच सुनेत्रा पवारांना कॉल केला. यावेळी महायुतीतील दोन्ही नेत्यांनी सबंध प्रकरणाची गंभीर दखल घेतली

Published on: Jun 08, 2026 5:55 PM
Follow Us