Chhagan Bhujbal | LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा

| Updated on: Mar 16, 2026 | 4:24 PM

राज्यात सध्या इंधन आणि गॅस टंचाईची चर्चा सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गॅस पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्राने राज्याला कळवले आहे की एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच रांगा लावणे किंवा गॅसचे ब्लॅक मार्केटिंग करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात सध्या इंधन आणि गॅस टंचाईची चर्चा सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गॅस पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्राने राज्याला कळवले आहे की एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच रांगा लावणे किंवा गॅसचे ब्लॅक मार्केटिंग करू नये, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळ यांनी सांगितले की, गॅसच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2129 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत 1208 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून सुमारे 33 लाख 66 हजार 411 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 23 गुन्हे दाखल झाले असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरची किंमत 852.50 रुपयांवरून 912.50 रुपये झाली आहे, तर व्यावसायिक सिलिंडर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये झाला आहे. तसेच एलपीजीचे दैनिक उत्पादन 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना गॅस पुरवठ्यात 100 टक्के प्राधान्य देण्यात आले आहे, तर रेल्वे, हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपहारगृहांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

Published on: Mar 16, 2026 04:24 PM
Follow Us