अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

| Updated on: Feb 18, 2026 | 10:06 AM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवारांनी या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे आश्वासन दिले आहे.

अजित पवारांच्या कथित विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दादांच्या विमान अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

यापूर्वी रोहित पवार यांनी अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि पायलट, विमान कंपनी तसेच हँडलिंग कंपनीच्या पार्श्वभूमीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

Published on: Feb 18, 2026 10:06 AM