झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा, महाराष्ट्राच्या चित्ररथाचं राजपथावर दमदार सादरीकरण

| Updated on: Jan 26, 2022 | 12:55 PM

झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !!. असा संदेश देत महाराष्ट्राच्या जैवविविधता मानके संकल्पनेवरील चित्ररथाचे आज 73 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर दमदार सादरीकरण करण्यात आलं.

Follow us on

महाराष्ट्राच्यावतीनं या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात जैव विविधता दाखवणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. महाराष्ट्राची जैव विविधतेची प्रतिक यानिमित्तानं देशासमोर मांडण्यात आली.  महाराष्ट्रातील जैवविविधता राजपथावर उलगडून दाखवण्यात आली. …जपतो आम्ही जैव वारसा,जपतो आम्ही वसुंधरा ! झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !!. असा संदेश देत महाराष्ट्राच्या जैवविविधता मानके संकल्पनेवरील चित्ररथाचे आज 73 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर दमदार सादरीकरण करण्यात आलं. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर अखेर महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला.