महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच… भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद

महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच… भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद

| Updated on: Aug 01, 2026 | 4:25 PM

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांवरही निशाणा साधला. NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकार विरोधात आंदोलन केलं. या वेळी अनेकांनी दीपके याला पाठिंबा दिला.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांवरही निशाणा साधला. NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकार विरोधात आंदोलन केलं. या वेळी अनेकांनी दीपके याला पाठिंबा दिला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजपचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झूकताना दिसला. संजय शिरसाटांनी अभिजीत दीपकेची भेट घेतली. यावर भाजपचे प्रविण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.

दरेकर म्हणाले, “काँग्रेस आणि उबाठाचे समजू शकतो, मात्र संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजीत दीपकेंची भेट घेणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना समर्थन देणे महायुतीसाठी योग्य नसल्याचेही दरेकर म्हणाले. बच्चू कडू नौटंकी करत असून माध्यमांमध्ये येण्यासाठी विपर्यास करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये वाद वाढू शकते, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावरही दरेकरांनी टीका केली. राज ठाकरेंकडे खूप बुद्धी आहे, मात्र त्यांच्या बुद्धीची प्रिंट्स जनमानसात का उमटत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. चंद्रकांत पाटील सरळ आणि सज्जन व्यक्ती असल्याने त्यांच्यावर टीकेचा परिणाम होणार नाही, असे दरेकर म्हणाले.

Published on: Aug 01, 2026 4:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us