माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? शरद पवारांसोबत जमलंय?

| Updated on: Mar 28, 2024 | 10:11 AM

भाजपच्या रणजितसिंहांच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या मोहिते यांचं काय म्हणणं आहे? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. त्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेने पुन्हा माढ्याचं राजकारण ढवळून निघालंय. तर मुलं भाजप म्हणत असली तरी यंदा आपण ऐकणार नसल्याचे जयसिंह मोहितेंनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट....

Follow us on

माळशिरसचे मोहिते पाटील आणि शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळतंय. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी घेणार असल्याचे म्हटलंय. भाजपच्या रणजितसिंहांच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या मोहिते यांचं काय म्हणणं आहे? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. त्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेने पुन्हा माढ्याचं राजकारण ढवळून निघालंय. तुतारी हाती घेण्याचं आमचं ठरलंय, असं म्हणत जयसिंह मोहितेंनी मोठं विधान केलंय. माढा मतदारसंघात मोहिते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार असं बोललं जातंय. धैर्यशील मोहिते यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे काका जयसिंह यांनी आमचं ठरलं असून शरद पवार यांच्याशी औपचारिक चर्चा बाकी असल्याचे म्हटलंय. मुलं भाजप म्हणत असली तरी यंदा आपण ऐकणार नसल्याचे जयसिंह मोहितेंनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….