भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर… मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत सरकारला 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. अंतरावली येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत सरकारला 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. अंतरावली येथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे.” त्यांनी आजपासूनच आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे आवाहनही केले.
त्यांनी सरकारवर 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र न दिल्याचा आरोप केला. “58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सभेत बोलताना त्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी पुन्हा केली. “28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या,” असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला.तसेच, “29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तोपर्यंत वेळ द्या,” असे सांगत त्यांनी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
