Manoj Jarange Patil : मोठी चूक…तात्पुरतं नादी लावलंय, भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जरांगेंचा संताप, अजितदादांवर निशाणा
छगन भुजबळ जातीयवादी आहेत. त्यांना मंत्रिपद देऊ नका, असा विरोध अजित पवार यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
अजित पवार हे प्रचंड मोठी चूक करत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अजित पवार हे जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत. याच्या परिणामाला अजित पवारांना सामोरे जावे लागेल, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर भुजबळ यांचे कट्टर विरोधक आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी की नाही? हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाला की नाही? याचा आम्हाला फरक पडत नाही. तर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्यामुळे छगन भुजबळ यांना तात्पुरता आनंद दिला असणार आहे. छगन भुजबळ यांना चॉकलेट दिले असणार आहे. परंतु लवकरच छगन भुजबळ यांच्या आनंदावर विरजण पडणार, असंही जरांगे पाटील म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला

महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा

ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
