मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही… भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता…

मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही… भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता…

| Updated on: Aug 09, 2026 | 2:04 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. माढा येथे झालेल्या सभेत त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. माढा येथे झालेल्या सभेत त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. मराठवाड्यात कुणबी समाजाची 4 प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

माढ्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

माढ्यातील सभा दुपारी 3 वाजता होणार होती. मात्र, जरांगे पाटील यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे ही सभा रात्री साडेअकरा वाजता पार पडली. माढ्यात पोहोचताच समर्थकांनी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले.

सभेत जरांगे पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटावरही आरोप केले. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही,” असे त्यांनी म्हटले.

Published on: Aug 09, 2026 2:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us