Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्… पहा व्हिडीओ
मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला पंढरपूरमधून सुरुवात होणार आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आक्रमक असून, या दौऱ्यातून ते मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधणार आहेत. उद्या पंढरपुरात आगमन झाल्यानंतर रविवारी तालुक्यातील सरकोली येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी दौऱ्याची सुरुवात होत असून, या माध्यमातून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पंढरपूरच्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात संवाद सभांची मालिका सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक पातळीवरील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दौऱ्यात अनेक लोकप्रतिनिधी जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर असण्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकोली येथील सभेत ते कोणते मुद्दे मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. सभेतील भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. पंढरपूरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांच्या सभा आणि संवाद कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
कुणबी प्रमाणपत्र, सातारा गॅझेट आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरणातही चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.