मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
काल दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे, गॅझेट लागू करण्याचंही आश्वासन दिलं आहेहे. सगे सोयरेची अंमलबजावणीसाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून आरक्षणसाठी बसणार होते. पण त्यांनी आपलं उपोषण 15 दिवसांसाठी पुढे ढकललं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या दोन मागण्या मान्य केला आहे. इतर मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी 15 दिवसाची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, ऊर्वरीत मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसणार असल्यचां मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या 15 दिवसाच्या काळात मनोज जरांगे हे गाव भेटी घेणार आहेत. मराठा समाजातील जनतेशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.