Pune | पुण्यात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक
केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या (SEBC) एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना देणार, हे स्पष्ट केल्यानंतर आता राज्यात पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडत आहे.
केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या (SEBC) एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना देणार, हे स्पष्ट केल्यानंतर आता राज्यात पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडत आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला मराठा अभ्यासक आणि कायदेतज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. यावेळी 102 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात चर्चा होईल. या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती पत्रकारपरिषद घेऊन पुढची भूमिका मांडतील. या बैठकीला राज्यभरातून मराठा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
