Chinchpokli Fire Video : मुंबईच्या चिंचपोकळीतील इमारतीत अग्नितांडव, भीषण आगीचा बघा VIDEO

Chinchpokli Fire Video : मुंबईच्या चिंचपोकळीतील इमारतीत अग्नितांडव, भीषण आगीचा बघा VIDEO

| Updated on: Feb 28, 2025 | 1:12 PM

चिंचपोकळी परिसरात असणाऱ्या एका उंच इमारतीला भीषण आग लागली असून अग्नीशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपोकळीतील निर्मल पार्क परिसरात असलेल्या इमारतीत ही आग लागली.

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील चिंचपोकळी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चिंचपोकळीमधील निर्मल पार्क परिसरात आग लागल्याची माहिती मिळतेय. चिंचपोकळी परिसरात असणाऱ्या एका उंच इमारतीला भीषण आग लागली असून अग्नीशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपोकळीतील निर्मल पार्क परिसर बी ए रोडवरील ग्रेड इन्स्टा मिलनजीकच्या सासलेट बिल्डिंगला ही भीषण आग लागली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली असून ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. चिंचपोकळीचा परिसरात नेहमीच माणसांसह वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. याच ठिकाणी असणाऱ्या सासलेट या उंच बिल्डिंगला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चिंचपोकळीतील निर्मल पार्क परिसरात असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यांमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. दरम्यान, या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Feb 28, 2025 01:12 PM